वैजापूर | प्रतिनिधी
मला उलटे टांगण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाच हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर हिंदुत्वाला तिलांजली देऊन काँग्रेस सोबत सत्तेत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना उलटे टांगले असते, अशा शब्दात बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. करंजगाव येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार रमेश बोरनारे बोलताना म्हणाले, ‘आम्हाला वाटलं ठाकरे एखाद्या उमेदवाराची घोषणा करतील. मात्र त्यांनी आपण काय केले हेच सांगितले. मी ठरवलं होतं की ठाकरे आणि वाणी या दोन घरांबद्दल बोलणार नाही. जेव्हा तिकीट मिळणार होतं तेव्हा शेवटच्या वेळेस उद्धव ठाकरे पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र मी त्यांना भेटून २५ वर्षे मी वाणीसाहेबांची सेवा केली. माझ्यासारख्याला तिकीट दिले नाही म्हणजे कार्यकर्त्याची आत्महत्या असे मी त्यांना सांगितले होते.
हे देखील वाचा : दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांमध्ये उत्साह
तसेच,हे (उद्धव ठाकरे) म्हणतात आज साहेब असते तर उलट टांगलं असतं. मात्र आज जर साहेब असते अन् हे काँग्रेससोबत गेले असते तर बाळासाहेबांनी त्यांना उलट टांगलं असतं. आज हे ज्यांनी वाणीसाहेबांना शिव्या दिल्या त्यांच्यासाठी काम करत आहेत. वाणीसाहेब आज असते तर त्यांनी मला शिंदे सहेबांसोबतच जा असेच सांगितले असते. वाणीसाहेबांना अनेकदा शिवसेनेत त्रास झाला. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा वाणीसाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. असा आरोप देखील त्यांनी केला.
पुढे बोलताना बोरनारे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणता वॉटर ग्रीड त्यांनी काढली त्यांना जाऊन विचारा योजना काय आहे? कुठे काय वापरले? कुठे किती निधी दिला? त्यांना काहीही माहिती नाही. आजपर्यंत २५-३० वर्षांत आम्ही जेव्हाही मतदान मागितले ते धनुष्यबाणाला मागितले. आजही धनुषबाणालाच मागतोय. तुमच्यासारख्या लोकांना जाळण्यासाठी टेंभा नाही हाती घेतला आम्ही. अशी आगपाखड बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
हे देखील वाचा : नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला अन्…
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
पेटवायला आलो आहे. वैजापूर तालुक्याला येथील आमदाराने गद्दारी करून जो कलंक लावला आहे तो कलंक या २०२४ च्या निवडणुकीत गद्दाराला गाडून पुसा असे आवाहन त्यांनी जनतेला केले. तर आमदार बोरनारे यांना तुम्ही निवडणुकीत उभेच रहा, असे आव्हानही दिले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा