Saturday, May 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVaishnavi Hagawane Death : दिराने बैलासमोर ठेवला होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम; Video...

Vaishnavi Hagawane Death : दिराने बैलासमोर ठेवला होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम; Video आला समोर

पुणे | Pune 

- Advertisement -

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता यांना अटक केली होती.सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. त्यांना देखील पोलिसांनी शुक्रवार (दि.२३) रोजी अटक केली आहे.

दुसरीकडे या प्रकरणात हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप (Mayuri Jagtap) हिने देखील आपल्याला मारहाण झाली होती, असा गंभीर आरोप हगवणे कुटुंबावर केला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहे. अशातच आता हगवणे कुटुंबाने बैलासाठी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबाने एप्रिल २०२३ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात स्टेज जवळ फक्त बैल उभा होता आणि स्टेजवर गौतमी पाटील नाचत होती. या कार्यक्रमासाठी वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याने भला मोठा स्टेज बांधला असल्याचे बोलले जात असून, त्याठिकाणी गौतमी पाटील नाचतांना दिसत आहे.

दरम्यान, गौतमीच्या पाठीमागे स्टेजवर सुशील हगवणे यांचा मोठा फोटो आणि नावंही झळकलं असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे बोलले जात असून, यात स्टेज पुढे गौतमी पाटील नृत्य सादर करतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्याला

Rohini Khadse: “राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम”….; रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे...

0
पुणे | Pune पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने...