Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVaishnavi Hagawane Death : "नको त्या व्यक्तीसोबत चॅट, तिची प्रवृत्तीच..."; हगवणे कुटुंबाच्या...

Vaishnavi Hagawane Death : “नको त्या व्यक्तीसोबत चॅट, तिची प्रवृत्तीच…”; हगवणे कुटुंबाच्या वकिलाचा कोर्टात खळबळजनक युक्तिवाद

पुणे | Pune 

वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणातील आरोपींना आज (२८ मे) पुणे न्यायालयासमोर (Pune Court) हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणी दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. तसेच वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असा गंभीर दावा देखील हगवणे कुटुंबाच्या (Hagawane Family) वकिलांनी केला आहे.

- Advertisement -

यावेळी हगवणे कुटुंबीयांचे वकिल युक्तिवाद करतांना म्हणाले की, “वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची. ते चॅट पकडण्यात आलं होतं. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने जीव देण्याचा प्रयत्न केला होता”, असा दावाही त्यांनी केला. तसेच एखाद्या नवऱ्याने (Husbend) आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असा, अजब युक्तिवाद देखील हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला.

YouTube video player

तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करतांना सांगितले की, “वैष्णवीच्या अंगावर मृत्यूवेळी ३० खुणा होत्या. त्यातील १५ खुणा या मृत्यूच्या १ दिवस आधीच्या आहेत. वैष्णवीला आत्महत्येच्या १ दिवस आधीपर्यंत कोण मारहाण करत होतं, ही मारहाण कोणत्या उद्देशानं सुरु होती, कोणत्या वस्तूंनी मारहाण करण्यात आली, याचा तपास करायचा आहे. ५१ तोळं सोनं कोणत्या बँकेत आहे, ते कशासाठी गहाण ठेवण्यात आलं आहे, याचा तपास शिल्लक आहे. त्यासाठी आरोपींची कोठडी वाढवून दिली जावी”, असे म्हटले.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न

दरम्यान, यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.ते म्हणाले की, “५१ तोळं सोनं व्यावसायिक कारणासाठी गहाण ठेवण्यात आलेले आहे. वैष्णवीच्या कुटुंबाकडे आम्ही फॉर्च्युनर कार मागितली नव्हती. आमच्याकडे ५ कोटींच्या कार आहेत. त्यामुळे आम्ही कार मागण्याचा प्रश्नच येत नाही,’ असा युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर फॉर्च्युनर कारची मागणी हगवणेंच्या कुटुंबाकडूनच करण्यात आल्याची माहिती वैष्णवीच्या कुटुंबियांनी न्यायालयात दिली.

निलेश चव्हाणला अडकवण्यात आलं

तसेच “ज्याच्याकडे वैष्णवीचे बाळ होते, त्या निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. कारण, निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला आहे. पण, त्यानेच हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या.पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे‌”, असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...