Friday, May 3, 2024
Homeनगरधन दांडग्यासाठी नव्हे, तर सामान्य माणसासाठी मोदींचे काम

धन दांडग्यासाठी नव्हे, तर सामान्य माणसासाठी मोदींचे काम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 75 वर्षाच्या काळात त सामान्य माणसासाठी कोणत्याही योजना राबवल्या गेल्या नाही, हे वास्तव आहे. विश्वनेता असा सार्थ गौरव प्राप्त केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून योजनांची निर्मिती केली. समर्पित भावनेने बलशाली भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असणारे मोदी यांच्या सरकारचे काम धन दांडग्यासाठी नव्हे, तर देशातील सर्वसामान्य घटकांसाठी सुरू आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळसाठी उपयोगी ठरणार्‍या साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमात नगर शहर आणि भिंगार परिसरातील 128 ज्येष्ठ नागरिकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अभय आगरकर, ज्ञानेश्वर काळे, दिलीप भालसिंग, बाबासाहेब पाटील वाकळे, वसंत राठोड, सचिन पारखी, तुषार पोटरे, महेश तवले, महेश नांदे, गीतांजली काळे, अंजली वल्लाकट्टी, आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वयोश्री योजनेचे लाभार्थी आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होत.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मुंडे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनीही मनोगत व्यक्त केले, तर आपल्या नेहमीच्या शैलीत मनोगत व्यक्त करताना कर्डिले म्हणाले सामान्यांच्यासाठी काम करणारे नेते ही मोदींची ओळख आहे. त्यांचा शंभरावा वाढदिवस देखील जनता देशभर उत्साहाने साजरा करेल. यावेळी मनोगत व्यक्त करताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 42 हजार ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. वृद्धापकाळसाठी आवश्यक असलेल्या उपयोगी साहित्याची किंमत साधारणपणे दहा हजार रुपये आहे.

या किमंतीचे जीवन उपयोगी साहित्य नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. मतदान कोणाला करावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, मात्र मतदान हे राज्याच्या देशाच्या भविष्यासाठी केले जाते देशाचे भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र योगदान देणार्‍या नरेंद्र मोदींसाठी देवाकडे जरूर प्रार्थना करा असा आग्रह डॉ. विखे यांनी केला, तसेच वयोश्री योजनेत अंतर्गत जिल्ह्यात 4 हजार 2000 लाभार्थ्यांना 45 कोटीचे साहित्य वितरित केले असून या योजनेत जिल्हा देशात नंबर वन असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार मधील कारभारावर नामोल्लेख न करता खा. विखे पाटील यांनी टीकास्त्र सोडले, ते म्हणाले मागील अडीच वर्षाच्या काळात राज्यात जनहिताचे कोणतेही काम झाले नाहीत. त्या काळात महसूल खात्याच्या कारभाराचे काय वर्णन करावे, आता ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याकडे महसूल मंत्री पद आले आहे. महसूल खात्याचे काम कसे असते हे आपण दाखवून देऊ. वाळू तस्करी अथवा पैसे घेण्यासाठी नव्हे तर गरिबांसाठी महसूल विभाग काम करेल अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन दुकानांच्या यादीत ज्यांच्याकडे बंगले आहेत, गाड्या आहेत अशा 25 टक्के लोकांची नावे आहेत, आता या लोकांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळून गरजवंत असलेल्या गोरगरिबांना धान्याचा लाभ मिळवून दिला जाईल. आगामी काळात शासन जनतेच्या दारापर्यंत जाऊन काम करेल असा विश्वास देखील खा.पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या