Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrakash Ambedkar : ॲड.प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल; हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर...

Prakash Ambedkar : ॲड.प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल; हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार

मुंबई | Mumbai
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज (गुरुवारी,३१ ऑक्टोबरला) पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.

पुढील ३ ते ५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील ३-५ दिवस बाळासाहेब रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. “बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”.

सोशल मिडिया पोस्टमध्ये काय लिहिले आहे?
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर आय. सी. यू मध्ये उपचार सुरू आहेत.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहेत. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस काम चालेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...