Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : खुन्नस काढण्यासाठी राडा; बजरंगवाडीत मध्यरात्री ताेडफाेड

Nashik Crime News : खुन्नस काढण्यासाठी राडा; बजरंगवाडीत मध्यरात्री ताेडफाेड

दंगलसदृश स्थिती निवळली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पुणे राेडवरील (Pune Road) नासर्डी पुलाजवळील बजरंगवाडी परिसरात मद्यपिंच्या टाेळक्याने रविवारी रात्री तुफान राडा घातला. खुन्नस काढण्यासाठी एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक (Stone Throwing) करुन शांतता धाेक्यात आणली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून दाेन्ही गटांतील १२ ते १५ जणांविराेधात बेकायदेशिर जमाव जमविल्यासह वाहनांचे नुकसान केल्याचा गुन्हा मुंबईनाका पाेलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) दाखल करण्यात आला आहे. तसेच एका गटातील तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शाेध सुरु करण्यात आला आहे. परिसरात सध्या शांतता असून दंगलसदृश स्थिती निवळली आहे.

हे देखील वाचा : जेलमधील लाच प्रकरण : लाचखाेर सीएमओची मालमत्ता रडारवर

बजरंगवाडी परिसरात (Bajarangwadi) रात्री दाेन ते तीन ठिकाणी घरगुती समारंभ व हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे या भागात गर्दी झाली हाेती. त्याचवेळी रात्री दहा वाजता बजरंगवाडीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खडकाळी, जुने नाशिक, कथडा व अन्य भागांतून माेपेड आणि दुचाकींवरुन आठ ते दहा सराईत संशयित हल्लेखाेर हातात दांडे व धारदार हत्यारे घेऊन आले. त्यांनी बजरंगवाडीत राहणाऱ्या काही संशयितांशी असलेल्या वैमनस्यासह मागील खुन्नस काढण्यासाठी त्यांना डिवचले. त्यामुळे काही क्षणांत दाेन्ही गटांनी आपल्याजवळील दांडे व धारदार हत्यारे बाहेर काढून एकमेकांवर चाल केली.

हे देखील वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

काही वेळातच परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यातून घडलेल्या राड्यात टाेळक्याच्या हल्ल्यात साेमनाथ दशरथ भगत, पवन भगत आणि मयूर भगत (तिघे रा. बजरंगवाडी) हे जखमी झाले. त्याचवेळी टाेळक्याने अंधाराचा फायदा घेत परिसरात पार्क असलेल्या भगत यांच्या डस्टर (एमएच १५ जीआर ६५१७) या कारसह तीन दुचाकी वाहनांची ताेडफाेड करत नासधूस केली. याबाबत नियंत्रण कक्षासह ‘डायल ११२’ ला माहिती कळविण्यात आली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत माजविणाऱ्या गुंडांची टोळी गजाआड

दरम्यान, त्यानुसार परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Kiran Kumar Chavan) वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशाेक गिरी, पाेलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख व गुन्हेशाेध पथकासह दंगल नियंत्रण पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तत्पूर्वी हल्लेखाेर दुचाकींवरुन पसार हाेण्यात यशस्वी झाले. तपास देशमुख करत आहेत.

मध्यरात्रीपर्यंत तणाव

या हल्ल्यामुळे परिसरात दहशत पसरली. दाेन गटांतील भांडणामुळे स्थानिकांना भितीच्या सावटाखाली वावरावे लागले. तर, पाेलिलांसह गुन्हेशाेध पथकांनी संशयितांची (Suspected) माहिती काढून सहभागी संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आली असून मागील खुन्नस काढण्यासाठी हा राडा झाल्याचे तपासात समाेर आले आहे. तसेच घटनेत जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतित सुधारणा हाेत आहे. 

हे देखील वाचा : Nashik Accident News : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक

ही आहेत हल्लेखाेरांची नावे

संशयित सराईत अभिषेक गाेपाळ जाधव, राहुल अशाेक ब्राह्मणे व नवाज हसन शेख आणि त्याचे साथीदार बजरंगवाडीतील काशीनाथ संकुलाजवळ उभे असताना खडकाळी व भद्रकालीतील सराईत जुबीन शेख, जफर शेख, युसुफ शेख व त्यांच्या साथीदारांनी येथे येत त्यांना मारहाण केली. त्यामुळे दाेन्ही गटांतील १० ते १५ जणांनी एकमेकांवर हल्ला केला. याबाबत बीएनएस कलम १०९, १८८-अ, १९४-२ १८९-२, १८९-४, १९० सह मपाेका १३५ प्रमाणे गुन्हा नाेंद झाला असून दाेन्ही गटांतील संशयितांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या