Monday, April 6, 2026
Homeदेश विदेशIran-Israel Conflict: "आम्ही त्यांना तात्पुरती तूट कमी करण्यासाठी…"; अमेरिकेच्या अर्थमंत्र्याचे विधान, काँग्रेसची...

Iran-Israel Conflict: “आम्ही त्यांना तात्पुरती तूट कमी करण्यासाठी…”; अमेरिकेच्या अर्थमंत्र्याचे विधान, काँग्रेसची टीका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आठवा दिवस आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने इस्रायलला सुमारे 151.8 दशलक्ष डॉलर्स किमतीची शस्त्रे आणि लष्करी मदत विकण्यास मान्यता दिली आहे. परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात लष्करी उपकरणांची तात्काळ विक्री करणे आवश्यक होते. यासोबतच, अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही सातत्याने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यातच अमेरिकेने इराणविरुद्ध सैन्य कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार अशी धमकीच अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे.

इराणवर आज रात्रीचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, इराणवर आज रात्रीचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल. त्यांनी सांगितले की या हल्ल्याचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना आणि क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यांना लक्षणीय नुकसान पोहोचवणे आहे. त्यांनी सांगितले की या कारवाईमुळे इराणची क्षेपणास्त्र क्षमता लक्षणीयरीत्या कमकुवत होईल. इराण दोन मोर्चांवर लढत आहे आणि तिथे अमेरिकेची मोहीम खूप प्रभावी ठरली आहे. आम्ही खूप प्रमाणात इराणला कमकुवत केले आहे. आमची मोहीम जबरदस्त सुरू आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

Iran-Israel Conflict: इराण-अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका; घरगुती, व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ

आम्ही सांगतो तसे भारत करतो
अमेरिकेने भारताला समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावरील रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी आधीच दिली आहे. आता आणखी बॅरलवरील निर्बंध मागे घेण्याबाबत आमचा विचार सुरू आहे. स्कॉट बेसेंट पुढे म्हणाले, भारतीयांनी खूप चांगले काम केले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना रशियन तेल आयात करू नका, असे सांगितले होते. तसे त्यांनी केले. आता तात्पुरती सूट मिळण्यापूर्वी भारताने अमेरिकेच्या आधीच्या विनंत्याचे पालन केले होते.

तात्पुरती तूट कमी करण्यासाठी रशियन तेल घेण्याची परवानगी दिली
“भारत आता अमेरिकन तेल आयात करणार होते. परंतु जगभरात आता तेलाची तात्पुरती तूट कमी करण्यासाठी आम्ही त्यांना रशियन तेल घेण्याची परवानगी दिली आहे”, असेही ते म्हणाले. इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच मध्य पूर्वेतील संभाव्या तेलपुरवठा खंडित होण्याची चिंता निर्माण झाली आहे.

काँग्रेसची टीका
काँग्रेसने स्कॉट बेसेंट यांच्या विधानानंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भारत हा अमेरिकेचे म्हणणे ऐकतो, त्यामुळे तो चांगला देश आहे, अशा आशयाचे विधान बेसेंट यांनी केले आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेला देश आता अमेरिकेच्या परवानगीची वाट पाहणार का? एका कमकुवत पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे अमेरिका उघडपणे असे बोलत आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

इराणमध्ये निष्पक्ष, न्यायपूर्ण वागेल असा नेता महत्त्वाचा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्या हातात इराणची सूत्रे गेली आहे. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेप घेतला. इराणचा नेता लोकशाहीवादी असावा हे गरजेचे नाही, कुठल्याही धार्मिक नेत्याच्या हाती सत्ता राहिली तरी त्याबाबत हरकत नाही असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणमध्ये निष्पक्ष आणि न्यायपूर्ण वागेल असा नेता महत्त्वाचा आहे. तो व्यक्ती कोण यावर निर्भर करते. मला धार्मिक नेत्यांची समस्या नाही. मी अनेक धार्मिक नेत्यांसोबत काम करतो. जो चांगले काम करेल आणि अमेरिका इस्रायलसोबत चांगले संबंध ठेवेल असा नेता हवा असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...