Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीत चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. मागील काही दिवसांपासून ते कर्करोग या गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर आज शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १० ऑगस्ट २०२४ – उत्तमतेची प्रक्रिया थांबणे हिताचे नाही

विजय कदम यांनी अनेक मराठी सिनेमांत (Marathi Movie) काम केलं आहे. त्यांनी हळद रुसली कुंकू हसलं, देखणी बायको नाम्याची, पोलीस लाईन, चष्मेबहाद्दर, सासू नंबरी जावई दस नंबरी, धुरंधर भातवडेकर या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी भिकाजीराव करोडपती, ती परत आलीये आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी सारख्या मालिकेतही त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.

हे देखील वाचा : जायकवाडीची चिंता मराठवाड्यापेक्षा नगर-नाशिकला जास्त

दरम्यान, विजय कदम यांनी १९८० साली छोट्या भूमिकेतून सिनेमात पदार्पण केले. कर्करोगातं (Cancer) निदान झाल्यानंतर ते कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होते. कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी करट हे त्यांचं लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या