मुंबई | Mumbai
ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन (Asha Nadkarni Passed Away ) झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. मागील अनेक वर्षे त्या मूत्रपिंडांच्या आजाराने (Kidney Disease) त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
“अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा…” ‘त्या’ क्षणाने फडणवीसांच्याही डोळ्यांत पाणी आलं, पाहा VIDEO
प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ‘ मौसी ‘ या चित्रपटात आशाजी यांना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम दिले. पन्नास ते सत्तरच्या दशकात अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर आशा नाडकर्णी यांनी काम केले होते. आशा नाडकर्णी यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा त्या १५ वर्षांच्या होत्या. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा विविध हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मानला तर देव’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.
Accident News : समृध्दी महामार्गावर विचित्र अपघात, आई-वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू