Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजन‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’चे गीतकार देव कोहली काळाच्या पडद्याआड

‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’चे गीतकार देव कोहली काळाच्या पडद्याआड

मुंबई | Mumbai

शंकर-जयकिशनपासून विशाल आणि शेखरपर्यंत अनेक आघाडीच्या संगीतकारांबरोबर काम करणारे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन झाले आहे. आज २६ ऑगस्ट रोजी त्यांनी ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देव यांचे पार्थिव घरी ज्युपिटर अपार्टमेंट, फोर्थ क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मुंबई इथे दुपारी २ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व उपचार करुनही देव कोहली यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 10 दिवसांपूर्वी प्रकृतीत सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवले होते. देव कोहली यांचे आज पहाटे चार वाजता झोपेतच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

देव कोहली यांनी त्यांच्या कारकिर्दीत शंभर पेक्षा अधिक चित्रपटांसाठी गीत लेखन केले. त्यांनी लिहिलेली सगळीच गाणी हिट ठरली आहेत. देव यांनी १९६९ मध्ये गुंडा या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. देव कोहली यांनी लिहिलेल्या हिट गाण्यांच्या चित्रपटांमध्ये मैने प्यार किया, बाजीगर, जुडवा टू, शूट आऊट ॲट लोखंडवाला, टॅक्सी नंबर 9-11 या चित्रपटांचा समावेश आहे. कोहली यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद, आनंद मिलिंद, उत्तम सिंग आणि अनेक नावाजलेल्या संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या