Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

पुणे(प्रतिनिधी)

ज्येष्ठ साहित्यिकआणि ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांचे आज दुपारी पावणेदोन वाजता कर्करोगाने दुःखद निधन झाले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ते बेशुध्द अवस्थेत होते. कोतापल्ले हे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षही आहेत. सामाजिक भान असलेले लेखक म्हणून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख होती.

मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९३च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरगांबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या