नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू असून हिंदू लोकांना लक्ष केले जातेय. हेच नाही तर भारतीय दूतावासाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला, मोठी दगडफेक करण्यात आली. बांगलादेशातील परिस्थितीचे पडसाद आज दिल्लीत बघायला मिळत आहे. बांगलादेशातील हिंदू युवक दीपू चंद्र दास याची जमावाने अमानुषपणे हत्या करून मृतदेह झाडाला बांधून जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. दरम्यान, आता या घटनेचे पडसाद भारतात उमटले आहेत. विश्व हिंदू परिषदेने आजपासून दिल्लीत निदर्शने सुरू केली आहेत.
बांगलादेशातील परिस्थिती चिघळत असून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. बांगलादेशात हिंदूंवर ज्याप्रकारे अन्याय केला जात आहे, त्यानंतर मोठा जनाक्रोश बघायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या बैठकीत भारताचे उप उच्चायुक्तही उपस्थित होते. आज सकाळी ११ वाजल्यापासून कार्यकर्ते बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जमले आहेत. दरम्यान, बांगलादेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, भारताच्या विविध भागांतील बांगलादेशी दूतावासांच्या आसपास वाढलेल्या सुरक्षा चिंतेमुळे प्रणय वर्मा यांना बोलावण्यात आले होते. बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या हत्येच्या विरोधात शनिवारी रात्री दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, ही शांतते निदर्शने सुरू आहेत. यादरम्यानच बांगलादेशातील हिंसेवर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे. मुहम्मद युनूस यांनी अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका फेब्रुवारीत होणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात बांगलादेशी विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर आणि त्यानंतर दीपू यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीनंतर झालेल्या भारतविरोधी निदर्शनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरीत्या बिघडले आहेत.
२२ डिसेंबर २०२५ रोजी, बांगलादेशात दिपूच्या हत्येविरोधात हिंदू संघटना आणि अल्पसंख्याक गटांनी ढाका येथील राष्ट्रीय प्रेस क्लबसमोर निदर्शने केली. निदर्शकांनी सांगितले की दिपू निर्दोष होता. त्यानंतर त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, झाडाला लटकवून नंतर कट्टरपंथियांनी जिवंत जाळले. निदर्शकांनी सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. या वर्षी जानेवारीपासून ५० हून अधिक गैर-मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





