Saturday, May 17, 2025
Homeधुळेदिवाळीनिमित्त बाजारपेठेत चैतन्य, खरेदीसाठी झुंबड

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत चैतन्य, खरेदीसाठी झुंबड

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

दिवाळीनिमित्त (occasion of Diwali) शहरातील बाजारपेठा सजल्या (Markets are decorated) आहेत. आकर्षक आणि विविधरंगी आकाश कंदील, (sky lantern,) पणत्या, रोषणाईच्या माळा, रंगीबेरंगी तोरण, महालक्ष्मीच्या मूर्ती अशा नावीन्यपूर्ण (Innovative items)वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. सायंकाळी लाईटींग (lighting) आणि आकाशकंदीचा लखलखात लक्ष वेधून घेत आहे. यंदा या सर्वच वस्तुंवर महागाईची झळ (Inflation on commodities) दिसत असली तरी वर्षातून एकदाच आणि आनंदाचा सण असल्याने नागरिकांची खरेदीसाठी (purchase of citizens) तुफान गर्दी केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर तर सायंकाळी चालणेही कठीण झाले आहे.

दरम्यान आजपासून दिपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सकाळी घरोघरी वसुबारसनिमित्त गाय आणि वासरूंची पुजा करून त्यांना नैवैद्य देण्यात आला. कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय यंदा दिवाळीचा सण साजरा करता येत आहे. यामुळे बाजारपेठेत तसेच ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून पन्नास रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आकाशकंदीलाची विक्री होत आहे.

याबरोबच विविध सजावटीचे साहित्यदेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. मात्र, या साहित्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तरीही वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची मागणी वाढली आहे. यंदा ग्राहकांनी चायना मेड वस्तूंकडे पाठ फिरली असून भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे बाजारात मिळणार्‍या आकाशकंदील, पणत्यांसह विविध सजावटीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होतेय. परंतू, नागरिकांनी चायना मेड वस्तूंकडे पाठ फिरवली असून याचा देखील परिणाम बाजारपेठेवर झाला आहे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

फटक्यांचे स्टॉल लागले-

दिवाळीत मोठ्याप्रमाणात फटक्यांची आतषबाजी केली जाते. यासाठी शहरांतील जेलरोडसह प्रमुख चौका-चौकात फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत. प्रामुख्याने आग्रा रोड व जेल रोडवरील दुकानांवर खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. फटाक्यांच्या किंमतीही वाढलेल्या असल्यामुळे अनेकांनी हात आखडता घेतला आहे. दरम्यान फटाक्याचे स्टॉल लावतांना अग्निसुरक्षा उपाय करणे आवश्यक असते. पंरतू तसे कोठेही दिसून येत नाही. त्यामुळे सुरक्षेचीही काळजी गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पणत्यांचे आकर्षण

दिवाळीत पणत्यांना विशेष महत्त्व असते. यंदा बाजारात पणत्यांचे विविध प्रकार आले असून, त्यात पाण्यावर तरंगणारी कमळांच्या आकारातील पणत्या, हत्तीच्या पाठीवर दिवे अशा फॅन्सी व मातीच्या पणत्यांची बाजारात चलती आहे. सेलवर चालणार्‍या पणत्याही सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. एक डझन पणत्यांची किंमत 30 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत आहे.

विविध रंगाच्या रांगोळी

दिवाळी हा तसा प्रकाशाचा सण समजला जातो. त्यामुळे घरावर आकर्षक अशी लाईट सजवली जाते. सजावटीच्या लाईट देखील बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत या लाईट माळांच्या किमती आहेत. त्याचसोबत विविध प्रकारची इलेक्ट्रिक पणत्या, समई, दिव्यांच्या माळा देखील उपलब्ध आहेत. विविध रंगाच्या रांगोळीची विक्री देखील वाढली आहे. रांगोळीचे रंग, पोस्टर रांगोळीचे रंग, रांगोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साचे बाजारात विक्रीसाठी आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या