Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनअक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ आता विकी कौशलसह 'ही' अभिनेत्री करोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ आता विकी कौशलसह ‘ही’ अभिनेत्री करोना पॉझिटिव्ह

मुंबई | Mumbai

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ आता विकी कौशल आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनाही करोनाची लागण झाली आहे. विकी कौशल आणि भूमी पेडणेकरने याबद्दल स्वतः माहिती दिली आहे.

विकी कौशलने म्हंटले आहे की, संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन असून माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या, अशी विनंती विकीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे.

भूमी पेडणेकरने म्हंटले आहे कि, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. सध्या मी विलगीकरणात असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या. तसेच, सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. सर्व काळजी घेऊनही मला करोनाची लागण झाली. मास्क घाला. सॅनिटाइझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा आणि सामाजिक भान राखा, असे आवाहन भूमीने नागरिकांना केले आहे.

रामसेतूचं चित्रीकरण काही महिन्यांसाठी स्थगित

अक्षय कुमारच्या रामसेतूचं चित्रीकरण काही महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. राम सेतू या चित्रपटातील तब्बल ४५ कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.अक्षयचा राम सेतू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र तेवढ्यात अक्षयला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं चित्रीकरण थांबवून सेटवरील सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. लक्षवेधी बाब म्हणजे या चाचणीत तब्बल ४५ कलाकारांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या बाबमीमुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील त्यांच्या जीवनातील प्रसंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहिराती, फलक लावण्यास परवानगी दिली...