Wednesday, May 29, 2024
HomeनाशिकVideo : चिंचखेडची ऐनवेळी ठरलेली ग्रामसभा नागरिकांनी उधळली

Video : चिंचखेडची ऐनवेळी ठरलेली ग्रामसभा नागरिकांनी उधळली

चिंचखेड | वार्ताहर | Chinchkhed

दिंडोरी (Dindori) तालुक्यातील चिंचखेड येथे बुधवारी (दि. ९) ऐनवेळी ग्रामसभेचे (Gramsabha) आयोजन करण्यात आल्याने ग्रामस्थांनी ही ग्रामसभा उधळून लावली आहे…

- Advertisement -

चिंचखेड येथे बुधवारी ग्रामस्थांना कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामसभेच्या नियमानुसार ग्रामसभेची पूर्वकल्पना पाच ते सात दिवसांच्या आत ग्रामस्थांना देण्यात येते.

परंतु, ९ ऑगस्ट रोजी अचानक ग्रामसभा असल्याचे नागरिकांना समजल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चिंचखेड येथील ग्रामसभा स्थगित केली. यापूर्वी देखील चिंचखेड येथील दारू परवान्यासाठी घेण्यात आलेली रात्रीची सभा जिल्हाभर गाजली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या