Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशते आले,नमस्कार केला, नंतर थांबून चर्चा केली; PM मोदी-राहुल गांधींची चर्चा, व्हिडीओ...

ते आले,नमस्कार केला, नंतर थांबून चर्चा केली; PM मोदी-राहुल गांधींची चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महात्मा जोतीबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष उत्साहात साजरे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने एक विशेष लेख लिहिला आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले. महात्मा फुले यांना संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आले. यावेळी एका घटनेने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी एकत्र आल्याचे दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेच्या आवारातील ‘प्रेरणा स्थळ’ येथे आले. तेव्ह विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर केंद्रीय मंत्रीही तिथे उपस्थित होते. यावेळी मोदी आणि गांधी यांनी एकमेकांचे स्वागत केले आणि त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याच मनमोकळेपणाने चर्चा रंगली. या दृश्याने संपूर्ण देश सुखावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

Supriya Sule: अशोक खरात प्रकरणाची चर्चा दिल्लीपर्यंत; सुप्रिया सुळे संतापून म्हणाल्या, खरातने महाराष्ट्राची…

महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी जेपी नड्डा, अर्जुन मेघवाल, माजी राज्यसभा सदस्य हरिवंश, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. या स्वागताच्या वेळेस राहुल गांधीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरळ राहुल गांधी यांच्याकडे जात आपुलकीने विचारपूस केली. तसेच सुमारे दीड एक मिनिट पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेते अगदी मनमोकळेपणाने एकमेकांशी चर्चा करताना पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एटीएसची झाडाझडती! राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी छापे;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक...