मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) पराभव झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधान परिषदेची (Vidhan Parishad) उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत वर्णी लावून राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांनी आपल्याकडे किती संपत्ती आहे याची माहिती त्यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली.
हे देखील वाचा : मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपची पाच जणांची यादी जाहीर
यात भाजपच्या विधानपरिषदेच्या उमेदवार (Candidate) पंकजा मुंडे यांची एकूण संपत्ती (Assets) किती आहे? याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार पंकजा मुंडे यांच्या नावावर विविध बँक अकाऊंटमध्ये ठेवी आहेत.यामध्ये ९१ लाख २३ हजार ८६१ रुपये आहेत. तसेच मुंडे यांच्या नावावर १ कोटी २८ लाख ७५ हजार ६९४ रुपयांचे विविध शेअर आणि म्यूचलफंड आहेत. विशेष म्हणजे मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या नावावर एकही कार नसल्याचे म्हटले आहे. तर शेती आणि समाजसेवा हा त्यांचा व्यवसाय असल्याचे मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. तर उत्पन्नाचा स्रोत शेती, माजी विधानसभा सदस्य निवृत्तीवेतन आणि भाडे उत्पन्न हे असल्याचे पंकजा मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
हे देखील वाचा : Nashik Accident News : बस-ट्रकच्या अपघातात २५ जण जखमी
तसेच मुंडे यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत ९६ लाख ७३ हजार ४९० रुपये इतकी आहे. त्यांच्या नावावर जंगम मालमत्ता ६ कोटी ८ लाख १५ हजार ७०९ रुपये इतकी आहे. याशिवाय पंकजा मुंडे यांच्या नावावर २ कोटी ७४ लाख ८९ हजार ५१८ रुपयांचे कर्ज देखील आहे. तर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांच्या नावावर २ कोटी ५० लाख ३२ हजार ४२७ रुपयांचे बँक कर्ज आहे. तसेच पतीच्या नावे २४ कोटी ७७ लाख ७५ हजार ९१८ रुपयांचे वैयक्तिक कर्ज असल्याचेही पंकजा मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
त्याबरोबरच पंकजा मुंडे यांच्याकडे २ लाख ८४ हजार ५३० रुपयांची रोख रक्कम आहे. तसेच पंकजा मुंडेंकडे ४५० ग्रॅम म्हणजेच ३२ लाख ८५ हजार रुपयांचे सोने आणि चार किलो म्हणजेच ३ लाख २८ हजार रुपयांची चांदी आहे.तर २ लाख ३० हजार रुपयांचे इतर दागिने मुंडे यांच्याकडे आहेत.याशिवाय पंकजा मुंडेंच्या पतीच्या नावावर २०० ग्रॅम म्हणजेच १३ लाख रुपयांचे सोने आणि १ लाख ३८ हजार रुपयांची २ किलो चांदी आहे. तसेच त्यांच्याकडे २ लाख १५ हजार रुपयांचे इतर दागिने देखील आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा