Friday, August 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी महायुतीचे १७ उमेदवार ठरले…शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीकडून...

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी महायुतीचे १७ उमेदवार ठरले…शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीकडून यांना मिळाली उमेदवारी

नाशिक | Nashik
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुती आघाडीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर १७ जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. यानुसार महायुतीमध्ये भाजप ११, शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ जागांवर निवडणुक लढवणार आहे. जागावाटपानंतर महायुतीत भाजपने काल रात्री ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपच्या 11 उमेदवारांची यादी-
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार

- Advertisement -

शिवसेना ४ उमेदवारांची यादी
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी

संपादकीय : १ जून २०२६ – अभद्र युतीतून मानवी जीवाचा सौदा

राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांची यादी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे

विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे.

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून 
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून 

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांची आर्थिक कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी...