Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर;...

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर; कोणा कोणाला मिळाली संधी

मुंबई | Mumbai
राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. या निवडणुकीचा धुराळा उडाला असून येत्या १८ जून रोजी विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. ही निवडणुक अत्यंत चुरशीची होणार आहे कारण निवडणुक बिनविरोध होणार नाही कारण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी देखील सर्वच्या सर्व १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केले.

रविंद्र चव्हाण यांनी नुकतेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची अधिकृत भूमिका आणि रणनीती स्पष्ट केली. महायुतीमधील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असून, आम्ही अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात राज्यातील सर्वच्या सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप ११ जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे गट ४ जागांवर तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी २ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक ८ जागांवर निवडणूक लढवत आहे. ठाकरेंची शिवसेना ६ जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

दिल्लीत अग्नीकल्लोळ; रेस्टॉरंटला भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

महायुतीचे हे आहे उमेदवार
नागपूर – डॉ. राजीव भास्करराव पोतदार
भंडारा- गोंदिया – अविनाश आनंदराव ब्राह्मणकर
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण हनुमंत लखानी
अमरावती – प्रविण रामचंद्र पोटे
सोलापूर – राजेंद्र विठ्ठल राऊत
अहमदनगर – प्राजक्त प्रसादराव तनपुरे
जळगाव – नंदकिशोर भागवत महाजन
सांगली-सातारा – धैर्यशील ज्ञानदेव कदम
नांदेड – अमरनाथ अनंतराव राजूरकर
उस्मानाबाद-लातूर-बीड – बसवराज माधवराव पाटील
औरंगाबाद-जालना – सुहास त्र्यंबकराव शिरसाठ
ठाणे – रविंद्र सदानंद फाटक
यवतमाळ – दुष्यंत सतीश चतुर्वेदी
परभणी-हिंगोली – सईद शेरगुल खान
नाशिक – नरेंद्र भिकाजी दराडे
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत सुनिल तटकरे
पुणे – विक्रम संजय काकडे

ताज्या बातम्या

एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी मुदतवाढ

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ...