Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCongress: अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेस उमेदवार देणार, हर्षवर्धन सपकाळ...

Congress: अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेस उमेदवार देणार, हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत

मुंबई | Mumbai
शिवसेनेकडून उबाठा गटाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत अशी घोषणा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आता ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे राजकीय नजरा खिळल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार का असे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत पक्ष नेतृत्त्वासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाड झाल्याचे पाहायला मिळतेय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या या निर्णयावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे कॉंग्रेस विधान परिषेदेत आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर करताना चर्चा केली नाही, असं म्हटलं. काँग्रेसनं पाठिंबा फक्त उद्धव ठाकरे यांच्या नावाला दिला होता. नवं नाव कोणतं आलं असेल, चर्चा न करता ते पुढं गेलं असेल तर योग्य नाही. किमान चर्चा तरी आमच्यासोबत व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दोन वर्षात राज्यसभा आणि विधानपरिषद सोबत येणार आहे, त्यावेी काय होणार हे स्पष्ट झालं पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vidhan Parishad Election 2026 : मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढणार नाहीत; आदित्य ठाकरेंनी ‘या’ नेत्याची उमेदवारी केली जाहीर

महाविकास आघाडीत फुट?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, “शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची घोषणा केली असेल, तर आम्ही पाठिंबा देऊ. पण त्याआधी आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती. यावर आम्ही बैठक घेऊन चर्चा करू.”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी अशी आमची भूमिका होती. मात्र, आता त्यांनी दानवेंबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा झाली असेल. निवडणुकीला सामोरे कसे जायचे? हे आम्ही ठरवू, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?
काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता अंबादास दानवे यांनी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे… एवढं मला माहिती आहे. असं म्हटलं. बाकी पक्ष नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे भूमिका मांडतील. मी उमेदवार आहे, काँग्रेसशी मी कसा बोलणार, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले संजय राऊत यांचं ट्वीट बघा, महाविकास उमेदवार म्हणाले म्हणजे काँगेसशी बोलले असणार ना? आता काँग्रेसशी मी काय बोलणार? मला माझ्या पक्षाने उमेदवारी दिली बाकी पक्ष नेतृत्व जबाबदारी घेईल, असं अंबादास दानवे म्हणाले.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...