Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविधान परिषदेच्या निवडणुकीआधी बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, "आमचे तीन ते चार आमदार...

विधान परिषदेच्या निवडणुकीआधी बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “आमचे तीन ते चार आमदार फुटणार”

मुंबई | Mumbai
आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकूण ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे मिळून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. असं असतानाच आता एका आमदाराने थेट आमचे ३ ते ४ आमदार फुटतील असा दावा केला आहे. विशेष म्हणजेच याच दृष्टीने आम्ही नियोजन केले असल्याचेही या आमदाराने जाहीरपणे सांगितले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पक्षाला ही निवडणूक सर्वात सोपी जाईल असे सांगितले जात आहे त्याच पक्षातील आमदाराने हा दावा केला आहे. हे चार आमदार कोण आहेत याबद्दल सूचक संकेतही या आमदाराने दिलेत.

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘आमचे तीन ते चार आमदार फुटणार’ असे त्यांनी म्हटले आहे. परंतु निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आम्ही रनणिती बनवली असल्याचेही गोरंट्याल यांनी म्हटले आहे. गोरंट्याल यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

काय म्हणला कैलास गोरंट्याल?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार गोरंट्याल म्हणाले , “मी तुम्हाला बोललोय की कोण कोण आहे. मी फक्त इशारा करतोय. ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्यांचा नवरा अजित पवारसोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडच्या बॉर्डरवरचा एक आहे असे चार जे डाउटफुल आहेत. मी नावे सांगत नाही पण हे फुटतील,” असे म्हटले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत २७४ आमदार मतदान करणार आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महायुतीकडे १९७ आमदारांचे संख्याबळ असून, त्यांचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडे ६९ आमदाराचे संख्याबळ असून, त्यांचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. १४अतिरिक्त मतं काँग्रेसकडे आहे. ही मतं कुणाला मिळणार यावर इतर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील असं भाकित शेकाप नेते जंयत पाटील यांनी केलंय. त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांची नजर असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

0
नाशिक | Nashik नाशिकचा संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे (Madhukar Zende) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन (Passed Away) झाले. मृत्यसमयी ते...