Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVikram Kakade: कोट्यावधींची मालमत्ता, आलिशान बोटी अन् जय पवारांना दिलं इतक्या कोटींच...

Vikram Kakade: कोट्यावधींची मालमत्ता, आलिशान बोटी अन् जय पवारांना दिलं इतक्या कोटींच कर्ज; विक्रम काकडेंच्या मालमत्ता वाचून व्हाल थक्क

पुणे | Pune
राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी १८ जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे विधान परिषदेतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे देखील पुणे विधान परिषदेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र सुनील टिंगरेंना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून कुठलीही चर्चा नसताना पुण्यातून उमेदवारी दिल्याने विक्रम काकडे यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तर विक्रम काकडे यांनी एकूण संपत्ती किती आहे, याबाबतची माहितीही निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे समोर आली आहे.

विक्रम काकडेंकडे किती संपत्ती आहे?
निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार, विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे १५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. दीडशे कोटींच्या संपत्तीमध्ये 78 कोटी 95 लाख 65 हजार 531 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यात साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम आणि विविध बँकांमधील २९ लाख ५३ हजार रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. याशिवाय ४१० ग्रॅम सोने, ५ किलोहून अधिक चांदी, आलिशान बोटी, आलिशान घड्याळे, महागड्या गाड्यांचाही समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात त्यांची १५ कोटींची गुंतवणूक असून, त्यांच्याकडे ५० लाख रुपये किमतीची परवानाधारक हत्यारेही आहेत.

- Advertisement -

Nashik Vidhan Parishad Election : मंत्री महाजनांच्या मध्यस्थीला यश! गणेश गिते माघार घेण्याची शक्यता, तर गोकुळ गिते निवडणूक लढण्यावर ठाम

विक्रम काकडेंनी दिले जय पवारांना दिलं कर्ज
विक्रम काकडेंनी अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. इतरही अनेक बड्या असामींना आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे वाटली आहेत. यामध्ये परवेज ग्रँट यांना २ कोटी १७ लाख रुपये, तर रुस्तुम भरोचा, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, श्रीशा एंटरप्रायझेस आणि राज डेव्हलपर्स यांना मिळून सुमारे ४० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे.

दुबईतही आलिशान सदनिका
स्थावर मालमत्तेचा विचार केल्यास, काकडे यांच्याकडे ७४ कोटी ७ लाख रुपयांची, तर त्यांची पत्नी देविका यांच्या नावावर ९ कोटी १९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. मावळ आणि मुंढवा येथे जमिनी, पाषाण येथे ४५४४ चौरस फुटांची सदनिका असून, तशीच एक सदनिका त्यांनी पत्नीला भेट दिली आहे. विशेष म्हणजे काकडे यांची दुबईतही एक आलिशान सदनिका आहे.

या गडगंज संपत्तीसोबतच काकडेंवर ४१ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज आहे, तर ८ कोटी ३९ लाख रुपयांचा प्राप्तिकर (Income Tax) अद्याप थकीत असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...