Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : महाविकास आघाडीकडून पंचसूत्री जाहीर

विधानसभा निवडणूक २०२४ : महाविकास आघाडीकडून पंचसूत्री जाहीर

महाराष्ट्रातील महिलांसाठी देणार ३००० रुपये प्रति महिना व मोफत बस प्रवासाची सुविधा

मुंबई

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून प्रचाराची सुरवात झाली असून आज मुंबईतील बीकेसीत महाविकास आघाडीची सभा सुरु आहे. यात महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजने अंतर्गत प्रति महिना ३००० रुपये देणार तसेच महिलांसाठी व मुलींसाठी बस प्रवास मोफत देणार असल्याचे राहुल गांधी यांनी पंचसूत्रीत जाहीर केलं आहे.

यासोबतच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी कडून जाहीर करण्यात आलेली पंचसूत्री

१. कुटुंब रक्षण नावाने 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा कवच मिळणार

२. महिलांना दरमहा तीन हजार रुपये

३. समानतेची हमी दिली जाईल आणि जातीची जनगणना केली जाईल आणि 50 टक्के आरक्षण काढून त्यात वाढ केली जाईल.

४ शेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास पन्नास हजारांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.

५. तरुणांना दरमहा 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल.

    - Advertisment -spot_img

    ताज्या बातम्या