Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVijay Vadettiwar on Ajit Pawar : तिजोरी लुटून अजितदादांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली,...

Vijay Vadettiwar on Ajit Pawar : तिजोरी लुटून अजितदादांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, आता त्यांना बाजूला सारण्याचे…: विजय वडेट्टीवारांची खोचक टीका

मुंबई । Mumbai

निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते हे गृहीत धरून महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा सपाटा लावला आहे. काल (दि. १० ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ४० निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मात्र या बैठकीला वादाचीही किनार असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीतून १० मिनिटांतच काढता पाय घेतला असल्याची माहिती काही वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर खोचकी शब्दात टीका केली आहे.

महायुती सरकारकडून तिजोरीत पैसा नसताना अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. पण अनेक विभागांमध्ये मात्र सचिवच नाही आहेत. तर काही विभागांत मर्जीतले सचिव बसवून तिजोरी लुटली जात आहे. अजित पवार यांनी अर्थविभागात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण सध्या ही शिस्त बिघडवूनच काम सुरु आहे. त्यामुळे आता अजितदादांनाच बाजूला सारण्याचे प्रयत्न असावेत, अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महायुती सरकारमध्ये वाद हे नेहमीचेच आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत वाद होत असतात. पण हे वाद महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी होतात. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल विजय वडेट्टीवारांना विचारणा केली असता ते म्हणाले, विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. काही जागांवर आम्ही दोन तीन चार वेळेला पराभूत झालो असलो तरी त्या ठिकाणी तिथे शरद पवार गटाची किती ताकद आहे हे पहावे लागेल. आम्ही तिथे हरलो म्हणून जागा सोडावी असं होत नाही. मेरीट प्रमाणे निर्णय होईल. जिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसने लढावं. जेव्हा आम्ही हरलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जागावाटप जवळपास झाले आहे. आता ५० ते ५५ जागांचा प्रश्न शिल्लक आहे. १४ तारखेच्या अखेरच्या बैठकीत निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

दरम्यान अजित पवार यांनी मात्र ही बातमी फेटाळून लावली आहे. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे बैठकीतून बाहेर पडलो, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपण बैठकीतून बाहेर पडलो. लातूरमध्ये नियोजित कार्यक्रमाला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या