Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याCAG Report 2023: नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल; काँग्रेस नेत्यांचा...

CAG Report 2023: नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल; काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप

मुंबई | Mumbai

कॅगच्या अहवालात (Cag Report) मोदी सरकारच्या (Modi Government) सात योजनांमधील भ्रष्टाचारावरून (Seven Scheme’s Corrupution) ताशेरे ओढण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

- Advertisement -

कॅगने त्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हे वृत्त येताच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली. आता सरकारचे उत्तर आले आहे. कॅगचा हा दावा अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Opposition Leader Vijay Wadettivar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा (Nitin Gadkari) काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.”

आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात मोठा धक्का! ‘या’ खेळाडूवर चार वर्षांची बंदी, होती पदकाची आशा

प्रत्येक विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगनी केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. गडकरींच्या बाबतीत सगळेच सांगतात की स्वच्छ प्रतिमा आहे. विकासाच्या बाबतीत ते त्यांची प्रतिमा चांगली आहे. यातून त्यांना बाजूला करण्याचा दृष्टिकोन दिसतो, असे वडेट्टीवार म्हणाले.

तर दुसरी गोष्टी अशी आहे की रस्ते व महामार्ग समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तर त्यांची भूमिका काय आहे?. आता समोर आलेल्या अहवालावर केंद्र सरकार काय कारवाई करते, याकडे आमचे लक्ष आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले

Cabinet Decision : कॅसिनो कायदा रद्द; गणेशोत्सव, दिवाळीमध्ये १०० रुपयात आनंदाचा शिधा… मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

“कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचे लक्ष आहे,” असेही वडेट्टीवारांनी नमूद केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या