संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील जोर्वे येथे गावाच्या मुख्य चौकात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे समर्थक एकमेकांसमोर आले. रविवारी (दि. 1) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण 42 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
जोर्वे गावातील मुख्य चौकात लोखंडी पोल उभारण्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने यापूर्वीच संबंधितांना सूचना दिलेल्या असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून पोल लावण्यात आल्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. जलसंपदा तथा विखे-पाटील आणि माजी मंत्री थोरात यांच्या समर्थकांमध्ये हा वाद झाला. जिल्हाधिकार्यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 (1) व 37 (3) अन्वये लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित महाजन यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार पहिल्या गटातील इंद्रजीत पंडित थोरात, सुरेश जगन्नाथ थोरात, शरद नारायण थोरात, संजय निवृत्ती थोरात, राजेंद्र श्रीपत थोरात, वसंत मुरलीधर बोरकर, अक्षय गणपत दिघे, रमेश बाळासाहेब दिघे, मुकेश विठ्ठल काकड, सत्यजीत प्रकाश थोरात, हर्षल निवृत्ती काकड, विठ्ठल नानासाहेब काकड, भाऊसाहेब बाबुराव दिघे, अभिषेक शरद थोरात, बादशहा रामकृष्ण बोरकर, अमित भास्कर थोरात, पुंजा यादव दिघे, कैलास पुंडलिक इंगळे, किसन हिरामण खैरे, दिगंबर नामदेव इंगळे, राहुल रवींद्र बोरकर, अनिल बाळासाहेब दिघे (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसर्या गटातील गोकुळ गणपत दिघे, नितीन सखाराम दिघे, विशाल भास्कर थोरात, वसंत उर्फ सचिन रामभाऊ दिघे, शरद गणपत दिघे, बाळासाहेब विठोबा जोर्वेकर, अनिकेत भारत जोर्वेकर, मयूर नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात, रवींद्र नामदेव गाडेकर, बाळासाहेब कारभारी दिघे, दिलीप विठ्ठल काकड, प्रकाश वसंत काकड, गणेश बंडोपंत काकड, नंदू कारभारी थोरात, बाळासाहेब राधू इंगळे, मच्छिंद्र अंबादास पिंपळे, जितेंद्र कैलास दिघे, नवनाथ उर्फ भावड्या गंगाधर बलसाने, पंढरीनाथ दादाभाऊ बलसाने (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करीत आहेत.




