Monday, November 30, 2026
HomeनगरAhilyanagar : दहा जागांसाठी 99.27 टक्के मतदान, आज निकाल

Ahilyanagar : दहा जागांसाठी 99.27 टक्के मतदान, आज निकाल

अकोले, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपुरात 100 टक्के तर संगमनेरात 714 जणांचे मतदान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीतील बिनविरोध न झालेल्या दहा जागांसाठी सोमवारी (दि. 2) शांततेत मतदान पार पडले. सोसायटी मतदारसंघातील चार आणि राखीव प्रवर्गातील सहा अशा दहा जागांसाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील 99.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 3 हजार 837 मतदारांपैकी 3 हजार 809 मतदारांनी मतदान केल्याने मतदानाची टक्केवारी विक्रमी पातळीवर पोहोचली.

- Advertisement -

दरम्यान, आज मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेच्या सारीपाटावर उर्वरित दहा जागांवर कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील अकोले, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या पाच तालुक्यांत शंभर टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार असलेल्या संगमनेर तालुक्यातील 715 मतदारांपैकी 714 जणांनी मतदान केले. त्यामुळे येथे 99.86 टक्के मतदानाची नोंद झाली.

दुसरीकडे, राहुरी तालुक्यात 98.06 टक्के, तर शेवगाव तालुक्यात 98.29 टक्के मतदान झाले. जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. विविध तालुक्यांत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अनेक नेत्यांनी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अन्य भागांत भेटी दिल्या. अहिल्यानगर शहरातील मतदान केंद्रावर आमदार संग्राम जगताप, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उमेदवार संगीता वाघ, हर्षदा काकडे यांच्यासह समर्थकांची उपस्थिती होती. शहरातील नेते भानुदास कोतकर यांचा दशक्रियाविधी असल्याने सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. मात्र, दुपारनंतर मतदानासाठी मतदारांचा ओघ वाढला.

दुपारी तीनपर्यंत 88 टक्के मतदान
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये सकाळच्या तुलनेत दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र दिसून आले. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 3 हजार 837 मतदारांपैकी 3 हजार 378 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार मतदानाची टक्केवारी 88.4 टक्क्यांंवर पोहोचली होती. बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत 655 मतदारांनी मतदान केले होते. त्यावेळी मतदानाची टक्केवारी 17.07 टक्के होती. त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानात लक्षणीय वाढ झाली. या वेळेपर्यंत 2 हजार 203 मतदारांनी मतदान केले होते. त्यानुसार मतदानाची टक्केवारी 57.41 टक्क्यांवर पोहोचली. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 3 हजार 378 मतदारांनी मतदान केल्याने मतदानाची टक्केवारी 88.04 टक्के झाली.

तालुकानिहाय मतदान
अकोले 231 एकूण मतदान आणि झालेले मतदान 231 (100 टक्के), जामखेड 115 एकूण मतदान आणि झालेले मतदान 114 (99.13 टक्केवारी), कर्जत 168 एकूण मतदान आणि झालेले मतदान 167 (99.40 टक्केवारी), कोपरगाव 529 एकूण मतदान आणि 520 झालेले मतदान (98.30 टक्केवारी), नगर एकूण मतदान 399 आणि झालेले मतदान 387 (98.98 टक्केवारी), नेवासा एकूण मतदान 246 आणि झालेले मतदान 246 (100 टक्केवारी), पारनेर एकूण मतदान 227 आणि झालेले मतदान 225 (99.12 टक्केवारी), पाथर्डी एकूण मतदान 131 आणि झालेले मतदान 131 (100 टक्के), राहाता एकूण मतदान 263 आणि झालेले मतदान 260 (98.86 टक्के), राहुरी एकूण मतदान 258 आणि आणि झालेले मतदान 253 (98.06 टक्के), संगमनेर एकूण मतदान 715 आणि झालेले मतदान 714 (99.86 टक्के), शेवगाव एकूण मतदान 117 आणि झालेले मतदान 115 (98.29 टक्के), श्रीगोंदा एकूण मतदान 299 आणि झालेले मतदान 299 (100 टक्के), श्रीरामपूर एकूण मतदान 147 आणि झालेले मतदान 147 (100 टक्के) एकूण 3 हजार 837 मतदान आणि झालेले मतदान 3,809 (99.27 टक्के) असे आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अतिवृष्टीग्रस्त 1 हजार 792 विहिरींसाठी 2.61 कोटींचा निधी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2025-26 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या तसेच बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारच्या सरकारच्या मृद व जलसंधारण (रोहयो)...