Friday, November 15, 2024
Homeजळगावमंगेश चव्हाण यांच्या प्रचार रॅलीला गावा-गावात प्रतिसाद

मंगेश चव्हाण यांच्या प्रचार रॅलीला गावा-गावात प्रतिसाद

चाळीसगाव । प्रतिनिधी

तालुक्यात जलसिंचनाची कामे असतील, गावातील पाणीपुरवठा योजना असतील किंवा ग्रामीण भागातील रस्ते असतील, रस्त्यांचे काँक्रिटीकरण असतील, समाज मंदिरे असतील, सामाजिक सभागृह असतील, व्यायामशाळा असतील, ओपन जिम असतील, व लाडकी बहीण योजना असेल या सर्व योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला झालेला आहे. त्यामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व हे तितकेच महत्त्वाचे ठरल्याने ग्रामीण भागात गावागावातून प्रचार दौर्‍यात दिसून येत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचार रॅली ही रॅली ठरत नसून विजयाची रॅली असे चित्र पहावयास मिळत आहे.

- Advertisement -

महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकताच शहरी भागाचा दौरा पूर्ण केला असून आता ग्रामीण भागात जोर दिला आहे. प्रत्येक गावात घर ते घर भेट देण्यावर त्यांचा भर राहिला आहे जिल्हा परिषद गटनिहाय त्यांनी दौरे सुरू केले आहेत आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभाताई चव्हाण यांनी यापूर्वीच ग्रामीण भागाचा संपूर्ण दौरा संपवला आहे, आता आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुर आहे. काल रोजी टाकळी प्र.चा. – करगाव गट त्यांचा प्रचार दौरा संपन्न झाला. सकाळी खडकी बुद्रुक येथून सुरू झालेला प्रचार दौरा नंतर तांबोळे, चितेगाव, पिंप्री प्र.चा., शामवाडी, गणपुर, कोदगाव, बिलाखेड या गावात संपन्न झाला तर दुपारनंतर भोरस बु., भोरस खु., भोरस गायरान, इच्छापुर तांडा क्र -1, इच्छापुर तांडा क्र – 2, इच्छापुर तांडा क्र – 3, चैतन्य तांडा क्र – 4 करगाव गाव, तरवाडे, खरजई टाकळी प्र.चा. या गावांमध्ये संपन्न झाला. चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात देखील आमदार मंगेश चव्हाण यांना व्यापक प्रतिसाद लाभत असून ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पृष्टी, व ढोल ताशाचा गजरात स्वागत करण्यात येत आहे, विशेषतः महिला वर्ग देखील उशिरापर्यंत थांबून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या स्वागताची वाट पाहत आहेत.

ग्रामीण भागात प्रत्येक घरात आमदार आले पाहिजे यासाठी जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे. प्रचार दौर्‍याच्या निमित्ताने गावागावात काढण्यात आलेल्या प्रचार रॅली या नुसत्या प्रचार रॅली राहिल्या नसून दोन विजयाच्या मिरवणूक निघत आहेत असेच चित्र सध्या चाळीसगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचार दौर्‍या दरम्यान दिसून येत आहे. जनतेने विकास कामे करणार्‍या नेत्याच्या पाठीमागे उभे राहायचा खंबीर निर्णय घेतला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या