Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमBribe News : लाच घेताना ग्राम महसूल अधिकार्‍याला पकडले

Bribe News : लाच घेताना ग्राम महसूल अधिकार्‍याला पकडले

लाचलुचपत विभागाची पारनेरमध्ये कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (17 सप्टेंबर) पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान येथे सापळा रचून ग्राम महसुल अधिकारी वर्ग-3 दीपक भिमाजी साठे (वय-36, रा. हंगा, ता. पारनेर) यास 8 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

- Advertisement -

तक्रारदाराने आपला मुलगा व दोन पुतण्यांच्या नावे 1 एकर 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. या खरेदी खताचा फेरफार करून सातबारा नोंद घेण्यासाठी ग्राम महसुल अधिकारी साठे यांनी 10 हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे बुधवारी तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री करण्यासाठी पडताळणी करण्यात आली असता साठे यांनी प्रत्यक्षात 10 हजार रूपयांची मागणी केली.

YouTube video player

पुढे तडजोड करून 8 हजार रूपयांवर सौदा ठरला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पंचासमक्ष साठेला लाच रक्कम स्वीकारताना पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु आल्हाट यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...