पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC) उपसभापतीपदी विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांची बिनविरोध (Unopposed) निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे सविता तुंगार यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मंगळवार (दि.१३) रोजी सकाळी ११ वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी नवनिर्वाचित उपसभापतीपदी माळेकर यांनी दिली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सराईत गग्गा अटकेत; गावठी कट्टा, काडतुस हस्तगत
सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार (दि. १३) सकाळी साडे दहा वाजता सभापती देविदास पिंगळे यांच्यासह शिवाजी चुंभळे, उत्तमराव खांडबहाले,युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील,राजाराम धनवटे ,भास्करराव गावित,जगन्नाथ कटाळे,,कल्पना चुंभळे, निर्मला कड, सविता तुंगार, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, जगदीश आपसुंदे,हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम आदीसह संचालक बाजार समितीमध्ये (Market Committee) दाखल झाले.
हे देखील वाचा : संपादकीय : १४ ऑगस्ट २०२४ – संघर्षातून यशाकडे…
सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उपसभापतीपदासाठी विनायक माळेकर यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी बाजार समिती सचिव प्रकाश घोलप सहायक सचिव मनोज महाले,एन एल बागुल, मुख्य लिपिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा : दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता…; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची पोस्ट व्हायरल
तसेच संचालक संपतराव सकाळे यांच्यासह इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन माळेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र असोसिएशनचे पदाधिकारी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सभापती देविदास पिंगळे व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत उपसभापतीपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजवर शेतकरी हिताचीच कामे करीत आलो. यापुढेही ही कामे करीत राहील. संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
विनायक माळेकर, उपसभापती, कृउबा समिती, नाशिक
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा