Thursday, January 8, 2026
Homeक्रीडाVinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ५० किलो वजनी गटातून का खेळली?

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ५० किलो वजनी गटातून का खेळली?

पॅरिस । Paris

पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराश करणारी बातमी आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित करून देणारी कुस्तीपटू विनेश फोगट (vinesh phogat) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.

- Advertisement -

या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन जास्त झाले होते. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि ५० किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील.

YouTube video player

दरम्यान विनेश फोगट बऱ्याच काळापासून ५३ किलो वजनी गटात खेळत आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये तिनं ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता, परंतु पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती ५० किलो वजनी गटासाठी पात्र ठरली. ५३ किलो वजनी गटात तिला आपल्या ज्युनिअरकडून पराभव पत्करावा लागला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपही खेळली नाही, त्यामुळं तिला त्या गटात स्थान मिळालं नव्हतं.

विनेशने उपांत्या फेरित अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तिला क्यूबाची कुस्तीपटू गुजमान लोपेजीला ५-० ने हरवलं. तर, तिने आफल्या पहिल्या सामन्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आणि वर्ल्ड चॅम्पियन जापानच्या युई सुसाकीसोबत झाला होता. विनेशने सुसाकीला ३-२ ने हरवलं होतं.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...