Friday, November 22, 2024
Homeक्रीडाVinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

नवी दिल्ली | New Delhi

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ( Paris Olympics 2024) अंतिम सामन्यापूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र

या पोस्टमध्ये विनेश फोगाट हिने म्हटले आहे की, “आई कुस्ती माझ्याविरूद्ध जिंकली. तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. आता माझ्यात जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती,२००१ ते २०२४ तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन.” असं म्हणत जड अंतःकरणानं विनेशने कुस्तीला (Wrestling) अलविदा केले.

दरम्यान,विनेश फोगाटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकाने जिंकला आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती.पहिल्या दिवशी विनेशचे वजन ४९.५ इतके भरले. मात्र, उपांत्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन ५२ किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अपूर्ण राहिली.

हे देखील वाचा : Vinesh Phogat : अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची तब्येत बिघडली

तू हरली नाही, तुला हरवलं गेलं

विनेशच्या या घोषणेनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “विनेश तू हरली नाही तर तुला हरवलं गेलं आहे.तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस, तू भारताचा अभिमान आहेस,” असे बजरंग पुनियाने म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या