Tuesday, November 26, 2024
Homeधुळेमोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणे पडले महागात

मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणे पडले महागात

धुळे – प्रतिनिधी dhule

मोटर वाहन कायद्याचे (Motor Vehicle Act) उल्लंघन करणे वाहनधारकांना चांगलेच महागात पडले आहे. एकुण २४७ वाहन धारकांचे लायसन्स (license) प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन महिन्याच्या कालावधीसाठी निलंबीत केले आहे.

- Advertisement -

शहर वाहतुक शाखेकडुन दि.१ एप्रिल २०२२ ते दि.२८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विना हेल्मेट (helmet) वाहन चालविणे, दारु पिवुन वाहन चालविणे, चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे आदी मोटर वाहन कायदयाचे उल्लघन करणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली होती. या वाहनधारकांच्या कृतीमुळे मोठया प्रमाणात अपघात होवुन जिविताचे व मालमत्तेचे नुकसान होत असते.

वाहन धारकांनी अशा प्रकारची कृती पुन्हा करु नये, याकरीता सदर वाहन धारकांची अनुज्ञप्ती (लायसन्स) तीन महिने करीता निलंबन करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे कार्यालयात पाठविण्यात येत असतात. वरील मोटर वाहन कायदयाचे उल्लघन केलेलया एकुण २४७ वाहन धारकांच्या अनुज्ञप्ती (लायसन्स) तीन महिन्या करीता निलंबीत करण्यात करीता प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांचेकडेस प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांचे कडील पत्र क्र. ९४६/अनुज्ञप्ती/प्रापका/धुळे/ २०२३ दि.८ मार्च २०२३ अन्वये वरील मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकुण २४७ वाहन धारकांच्या अनुज्ञप्ती (लायसन्स) तीन महिन्याच्या कालावधी करीता निलंबीत केल्या आहे. तरी शहरातील वाहन धारकांनी विना हेल्मेट वाहन चालविणे, दारु पिवुन वाहन चालविणे, चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे आदी मोटर कायद्याचे उल्लंघन होवुन त्यामुळे आपल्या व इतरांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान होणारी याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व शहर वाहतूक शाखेने केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या