Monday, November 25, 2024
Homeक्रीडाVirat Kohli : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम; सचिनलाही टाकलं मागे

Virat Kohli : किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम; सचिनलाही टाकलं मागे

कोलंबो | Colombo

आशिया कपच्या सुपर-४मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात लढत सुरू आहे. काल पावसामुळे थांबवण्यात आलेला सामना आज पुन्हा सुरु झाला. भारताला काल रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी दमदार सुरूवात करून दिली होती. शर्मा-गिल जोडीच्या शतकी भागिदारीनंतर केएल राहुल आणि विराट कोहली मैदानावर आले होते. मॅचच्या दुसऱ्या दिवशी या दोघांनी पहिल्या दिवसाची लय बिघडू दिली नाही. दोघांनी धावांचा वेग कायम ठेवला. राहुल-विराट जोडीने द्विशतकी भागिदारी केली…

- Advertisement -

Video : शाहीन आफ्रिदीच्या ‘त्या’ कृतीने जिंकली भारतीयांची मने; जसप्रीत बुमराहला दिले खास गिफ्ट

विराट कोहलीने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. पाकिस्तानविरुद्ध ९० धावा करताच विराटच्या वनडे क्रिकेटमधील १३ हजार धावा पूर्ण झाल्या. तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार करण्याची कामगिरी विराटने केली. याबाबत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ३२१ डाव खेळले होते. तर विराटने हीच कामगिरी फक्त २६७ डावात पार केली आहे.

असे आहेत वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • सचिन तेंडुलकर – १८ हजार ४२६

  • कुमार संगकारा – १४ हजार २३४

  • रिकी पॉन्टिंग – १३ हजार ७०४

  • सनथ जयसूर्या – १३ हजार ४३०

  • विराट कोहली – १३ हजार धावा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नोवाक जोकोविचने रचला इतिहास; २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरत बनला युएस ओपनचा बादशाह

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या