कोपरगाव | प्रतिनिधी
कोपरगाव येथे गुरूवारी गोळीबाराची घटना घडली होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास गोळीबार झाल्यामुळे कोपरगाव शहरामध्ये खळबळ उडाली होती. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गोळीबारामध्ये तन्वीर बालम रंगरेज हा तरुण जखमी झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल ८ जणांना अटक केली आहे.
दरम्यान, सदर गोळीबार प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे गोळीबार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत गंभीर आरोप असल्याचा विवेक कोल्हे यांनी केला आहे. तर काळेंसोबतच त्यांच्या स्वीय सहाय्यकालाही यासाठी जबाबदार धरले आहे. यासंदर्भातली फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
हे हि वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक, मध्येच सुरू झाला भलताच व्हिडीओ
तसेच, विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला जाब विचारत या काही वर्षात झालेल्या घटनांचे दाखले दिले. चक्री, बिंगो, बेकायदा रेशन, बाजार ओट्यावरील गांजा, अवैध शस्त्र कारखाना यावर पोलिसांचे लक्ष वेधले. महिला भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने असताना गोळीबार झाला तिथे इतर कुणाला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असते. महापुरुषांचे नाव घेऊन किंवा जातीवाचक शिवीगाळ करून वातावरण दूषित करणारे वाळूतस्कर आमदारांचे कार्यकर्ते आहेत हे समोर येते आहे. दोन वेळा मुस्लिम समाज धर्मग्रंथ विटंबना,धर्म कोणताही असो त्या धर्मगुरुला मारहाण होणे, समाजा समाजात तेढ निर्माण करणे ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेला परिणाम करणारे आहे.गोर गरीब समाजाला त्रास देऊन त्यांच्या रोजगारावर याचा परिणाम होतो आहे हे अशा प्रवृत्तींना जोपासनाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावे, असे देखील कोल्हे म्हणाले आहेत.
ज्याने गुन्हा केला त्या आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी आ.आशुतोष काळे यांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते. हल्ला झालेल्या युवकाने आमदार आणि त्यांचे स्विय्य सहाय्यक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडीओ दाखवत प्रशासनावर हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी रेशन विक्री सारख्या प्रकारात त्यांचे निकटवर्तीय आहेत. विरोधकांना गाडून टाका म्हणणाऱ्या आमदारांनी कोपरगावची कायदा सुव्यवस्था अक्षरशः बॉसगिरी करून गाडून टाकली आहे. असा हल्लाबोल कोल्हे यांनी केला
हे हि वाचा : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण
रात्री बाजर ओट्यांवर नशेचे पदार्थ सेवन करणाऱ्यांची गर्दी असते. जे नागरिक त्यावर बोलतात त्यांना गांजा पिणारे लोक धमकावतात. काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला दगड डोक्यात टाकण्याची धमकी दिली गेली होती. खडकी येथे शस्त्र कारखाना कुणाच्या जागेत होता त्यांवर काय कारवाई झाली? दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण युवतीच्या खून प्रकरणात राज्यातील इतर आमदार सभागृहात बोलले पण कोपरगावचे आ.काळे मात्र त्यात मौन राहिले ही शोकांतिका आहे. या पाच वर्षात अक्षरशः आशुतोष काळे यांनी चुकीचे प्रकार वाढीस येऊ देत विद्रुपीकरण केलें आहे असा हल्लाबोल कोल्हे यांनी केला काळे यांचें नाव न घेता केला.