Thursday, September 19, 2024
Homeनगरविवेक कोल्हे पवारांची 'तुतारी' फुंकणार?

विवेक कोल्हे पवारांची ‘तुतारी’ फुंकणार?

पुणे । Pune

- Advertisement -

पुढील काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. याबाबतची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. अशातच महायुतीमध्ये नाराजीचे चित्र पाहायला मिळतंय. आणि त्याचा थेट फायदा विरोधक उचलताना दिसत आहेत.

कोल्हापूरमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपला राम राम ठोकला असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील भाजप सोडण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान आता नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी इथं आज बैठक झाली. या बैठकीला विवेक कोल्हे यांनी उपस्थित लावली. मिळालेल्या माहितीनुसार विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेत, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या पाया पडले. विवेक कोल्हे यांच्या या कृतीने जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत. विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपमध्ये (BJP) आहेत. परंतु २०१९ मध्ये अवघ्या काही मतांनी पराभव झाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे. तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election) नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमदेवार किशोर दराडे त्यांना तगडे आव्हान दिले होते. आता विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे अजित पवारांसोबत गेले.

एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असे काळेंनी अनेकदा बोलून दाखवले आहे. त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आज विवेक कोल्हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी या महिन्यात दोन वेळा दौरा केला. एकीकडे अजित दादा आमदार काळेंची ताकद वाढवत असताना शरद पवारांनी जर तुतारीचा उमेदवार दिला तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या