Sunday, October 27, 2024
Homeनगरचला जबाबदारी पार पाडुया मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड आजच जोडुया

चला जबाबदारी पार पाडुया मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड आजच जोडुया

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भारत निवडणूक आयोगामार्फत 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदार यादीला आधार नंबर लिंक करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून बी. एल. ओ, सर्व शासकीय कार्यालय यांच्या मिटींग घेण्यात आल्या व तहसीलदार, नायब तहसीलदार यांची पर्यवेक्षक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली व मतदार यादीला आधार जोडण्याच्या मोहिमेला सुरवात करण्यात आली या मोहिमेमध्ये संगमनेर तालुक्यातील मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यात 217 संगमनेर मतदार संघातील 39 सायखिंडी या यादी भागाचे शंभर टक्के मतदान कार्डला आधार कार्ड लिंकिंग चे काम बी. एल. ओ श्री. रवींद्र वर्पे यांनी हे काम सर्वप्रथम पूर्ण केले आहे. त्याबद्दल त्यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन केले. तसेच संगमनेर तालुक्याचे आतापर्यंत 55,000 मतदार यांचे मतदान कार्डला आधार लिंक चे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त 16 टक्के काम संगमनेर मतदार संघाचे आहे.

तसेच संगमनेर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी आपली व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची आधार जोडणी करावी. यासाठी आपल्या भागातील बी. एल. ओ यांना सहकार्य करून आपले मतदान कार्ड आधारकार्ड ला जोडणी करून घ्यावे किंवा आपण आपण स्वताही voter helpline app द्वारे आपले व आपल्या कुटुंबाचे मतदान कार्डला आधारकार्डची जोडणी करू शकतो असे आवाहन अमोल निकम तहसीलदार संगमनेर यांनी नागरिकांना केले. या आधार जोडणीच्या मोहिमेची रूपरेषा व मार्गदर्शन व नियोजन डॉ. शशिकांत मंगरुळे मतदार नोंदणी अधिकारी 217 संगमनेर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर हे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या