Saturday, January 17, 2026
HomeनगरAhilyanagar : लोकसभेला केलेली चूक मतदारांनी दुरुस्त करायला सुरुवात केलीय

Ahilyanagar : लोकसभेला केलेली चूक मतदारांनी दुरुस्त करायला सुरुवात केलीय

मंत्री विखे पाटील यांचा दावा || आ. जगताप, डॉ. विखे यांच्याकडून नगरचा विजय जनतेला समर्पित

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लोकसभा निवडणुकीत नगरच्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटीव्हला फसून मतदान केले होते. पण मनपा निवडणुकीत त्या खासदाराला शहरात त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. कारण, आता त्यावेळी आपली चूक झाली होती, हे मतदारांच्या लक्षात आले व ती त्यांनी ती दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (16 जानेवारी) नगरमध्ये बोलतांना केला.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला ऐतिहासिक यश मिळाले आहे. आता महापौर कोणाचा करायचा यासंबंधीचा निर्णय युतीचे पदाधिकारी एकत्र बसून घेतील. यासंबंधी आधीच काही ठरलेले नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे. विधानसभा, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपा युतीने केलेली विजयाची हॅट्रीक असल्याची असल्याची प्रतिक्रीया मंत्री ना. विखे पाटील यावेळी दिली.

YouTube video player

विधानसभा नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत मिळालेला विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहिल्यानगरच्या जनतेला समर्पित करीत असल्याचे त्यांनी याप्रसंगी आ. संग्राम जगताप डॉ. सुजय विखे सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहीते विनायक देशमुख सुनिल रामदासी उपस्थित होते. नगरमधील मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेवक युतीच्या कार्यकर्त्यासमवेत यावेळी नेत्यांनी जल्लोष साजरा केला. भगव्या गुलालाची उधळण करून ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना मंत्री विखे पाटील यांनीही घोषणा देवून युतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही, हे निवडणुकीपुर्वीच मी सांगितले होते. तेच निकालातून स्पष्ट झाले.झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत. लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पराभव झाला की फक्त निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर टिका करण्यापलिकडे महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टिका ना.विखे पाटील यांनी केली.

झेडपीत देखील भाजपालाच यश
मुंबई-पुणे महापालिकांप्रमाणेच अन्य शहरांमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासात्मक बदलाला लोकांनी स्वीकारले हेच या निकालाने दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले. नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा स्ट्राइक रेट तसाच राखला गेला. महापालिकेच्या यशावर जनतेने केलेले शिक्कामोर्तब पाहाता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Shrigonda : 20 लाखांची खंडणी मागणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून याप्रकरणी तिघा आरोपींना...