Saturday, July 25, 2026
HomeनगरAMC Election : जेसीबी, डंपरमधून गुलालाची उधळण

AMC Election : जेसीबी, डंपरमधून गुलालाची उधळण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर महापालिकेचा निकाल शुक्रवारी दुपारी 12 नंतर जाहीर होण्यास सुरूवात झाली. निकाल अधिकृतपणे जाहिर होण्यापूर्वीच विजयाचा अंदाज येताच एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोडावून बाहेर निंबळक रोडवर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. यावेळी विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बेभान होऊन नाचत मुक्त हस्ताने गुलालाची उधळण केली.

- Advertisement -

निंबळक रोडवरील हॉटेल साईरत्न चौकापासून पुढे वखार महामंडळाकडे जाणार्‍या रोडपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. सकाळी या ठिकाणी निवडणुकीत सर्व उमेदवारांच्या समर्थकांनी आपली वाहने या ठिकाणी ठेवून मतमोजणीच्या ठिकाणी पायी चालत गेले होते. दुपारी 12 च्या दरम्यान, प्रभागनिहाय निकालाचा अंदाज आल्यानंतर समर्थक मतमोजणीच्या ठिकाणाहून निंबळक रोडवरील साईरत्न हॉटेल चौकात एकत्र आले. या ठिकाणी तोबा गर्दी झाली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी थेट दोन ते तीन डंपर बोलावले. या डंपरमध्ये बसून कार्यकर्ते एकमेकांवर गुलाल उधळत होते. या ठिकाणी काही वेळ जल्लोष साजरा केल्यावर कार्यकर्ते आणि समर्थकांची मिरवणूक निंबळक रोडने शहराच्या दिशेने निघाली.

मिरवणुकीच्या पुढे दुचाकी वाहनांची रॅली होती. तर काही उत्साही कार्यकर्ते चारचाकी वाहनाच्या टपावर बसून आनंद साजरा करत पुढे सरकरत होते. रॅलीमधील कार्यकर्ते जो दिसेल त्यांच्यावर डंपरमधून गुलाल उधळताना दिसत होते. यामुळे निंबळक रोडवरही वाहतूक कोंडी झाली होती. उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिस प्रशासन दिसून आले नाही.

मनमाड रोडवरही वाहतूक कोंडी
कॉटेज कॅार्नर, नागापूर पुल या ठिकाणाहून काही विजयी उमेदवारांच्या मिरवणुका या पुढे नगर शहराकडे जात होत्या. या मिरवणुका नगर-मनमाड महामार्गावरून मार्गक्रमण करत असतांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र, समर्थक उत्साहात असल्याने त्यांना आवरणार कोण, असा प्रश्न होता.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...