चाळीसगाव । प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रचारातही आघाडी कायम ठेवली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत व तसेच घरातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास आमदार मंगेश चव्हाण यांच्या नियोजन बद्ध प्रचार यंत्रणेमुळे यशस्वी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात शहर त्यांनी पिंजून काढले दुसर्या टप्प्यात ग्रामीण भाग पिंजून काढला.
आमदार मंगेश चव्हाण शहरात प्रचार करीत होते, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रतिभाताई ह्या ग्रामीणचा दौरा करत होत्या व जेव्हा प्रतिभाताई शहराचा दौरा करत होते तेव्हा आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण विभागाचा दौरा पूर्ण केला. विशेष म्हणजे प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेच्या विनंतीनुसार त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतले आहेत त्याचप्रमाणे ठिकठिकाणी कॉर्नर सभा व विविध समुदायाच्या विविध बैठका देखील घेतले आहेत आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच पातळीवर आघाडीवर आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात गेल्या अडीच वर्षाच्या महायुती शासनाच्या काळात सुमारे 3100 कोटीहून अधिक रुपयांचा निधी मतदार संघाचा विकास कामांसाठी मंजूर करून घेतला आहे याच विकास कामांच्या जोरावर त्यांनी मतांचा जोगवा मागितला असून जनतेकडून भरभरून प्रतिसाद त्यांना मिळाला आहे.
त्यांच्या प्रचार यंत्रणा यादेखील तितक्याच नियोजनबद्ध व सुनियोजित राबवल्या गेल्या आहेत त्यांच्या प्रचार यंत्रणांमध्ये आजी-माजी मंत्री ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने व तितक्यात जोमाने सहभागी झाले आहेत. कुठे गल्लीमध्ये पुष्पवृष्टी, कुठे मोठ मोठ्या रांगोळी सडा, तर कुठे फुलांचे सुशोभीकरण, फुलांचे डेकोरेशन, तर काही ठिकाणी विद्युत रोषणाई, तर कुठे घोड्यावरून मिरवणूक हे चित्र सर्वत्र पाहावयास मिळाले. मंगेश चव्हाण हे तालुक्यातील युवा वर्गाचा देखील गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळे जिथे जातील तिथे तरुणांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. चाळीसगावात शहरासह तालुक्यात विकास कामांमुळे चेहरा मोहरा बदलला असून विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली आहे. यामुळे मंगेश चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे.