Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : एक हजारापुढील मतदार असणार्‍या मतदान केंद्राची संख्या वाढणार

Ahilyanagar : एक हजारापुढील मतदार असणार्‍या मतदान केंद्राची संख्या वाढणार

पालिका निवडणूक || श्रीरामपुरात सर्वाधिक 90 केंद्र, त्या खालोखाल संगमनेरात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील 12 नगरपालिका- नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी 4 लाख 51 हजार 287 मतदार 289 नगरसेवकांचे भवितव्य घडवणार आहेत. जिल्ह्यातील 12 पालिकांमध्ये सध्या 502 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार एक हजारांहून अधिक मतदार असणार्‍या ठिकाणी मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात येणार असल्याने अनेक पालिकांमध्ये प्रभागातील मतदार संख्येनुसार मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या नगरपालिका निवडणुकीसाठी 2025 मधील विधानसभेसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी वापरली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून श्रीरामपूर पालिका आहेत. श्रीरामपूर शहरातील मतदारांची संख्या 80 हजार 992 झाली आहे. या ठिकाणी 34 नगरसेवकांच्या निवडीसाठी 90 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकावरील पालिका म्हणून संगमनेरची ओळख आहे. संगमनेर शहरात 57 हजार 714 मतदार असून 30 नगरसेवकांची निवड करणार आहेत. निवडणुकीसाठी 61 मतदान केंद्र आहेत. शेवगाव नगरपालिका ही जिल्ह्यातील तिसर्‍या क्रमांकावरील मोठी नगरपालिका आहे. 35 हजार 479 मतदार 38 मतदान केंद्रांच्या माध्यमातून 24 नगरसेवक प्रतिनिधी म्हणून निवडणार आहेत. देवळाली प्रवरा (ता. राहुरी) नगरपालिकेत 23 हजार 861 मतदार 21 नगरसेवकांची निवड करणार आहेत. सध्या 26 मतदान केंद्र होते.

YouTube video player

जामखेड शहरातील मतदारांची संख्या 33 हजार 161 आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोपरगाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोपरगाव नगरपालिकेवर कोणाची सत्ता हे राजकीयदृष्ट्या महत्वाचे मानले जाते. कोपरगाव शहराची मतदार संख्या 63 हजार 453 असून नगरसेवकांची संख्या 30 आहे. मागील नगरपालिका निवडणुकीसाठी 75 मतदान केंद्र होते. नेवासे नगरपंचायतीमध्ये 18 हजार 712 मतदार आहेत. हे मतदार 17 नगरसेवकांचे भवितव्य ठरविणार आहे. या निवडणुकीसाठी 21 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. राजकीयदृष्टया पाथर्डी नगरपालिकेची सत्ता महत्वाची मानली जाते. पाथर्डी नगरपालिका कार्यक्षेत्रात 23 हजार 242 मतदार आहेत. हे मतदार 20 नगरसेवक निवडणार आहेत. पूर्वी 28 मतदान केंद्र होते. जिल्ह्यातील वेगाने वाढणार्‍या नागरी क्षेत्रामध्ये राहाता शहराचा समावेश होत आहे.

राहाता नगरपालिकेची मतदार संख्या 19 हजार 465 असून 20 नगरसेवकांची निवड करणार आहेत. 21 मतदान केंद्र आहेत. राहुरी नगरपालिकेत 33 हजार 269 मतदार असून 24 नगरसेवकांचा आराखडा आहे. 35 मतदान केंद्र आहेत. श्रीगोंदे शहराचे 28 हजार 326 मतदार 22 नगरसेवकांची निवड करणार आहेत. श्रीगोंदे शहरातील लोकसंख्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये विखुरलेली असून 36 मतदान केंद्र आहेत. शिर्डी शहरात हॉटेलसह इतर व्यावसायिक कारणांमुळे परप्रातिय नागरिकांची संख्या वाढत आहे. शिर्डी शहरात 33 हजार 613 मतदार आहेत. 23 नगरसेवक निवडीसाठी 36 मतदान केंद्र आहेत. दरम्यान, निवडणूका होणार्‍या सर्व पालिकांमध्ये ज्याज्या ठिकाणी एक हजारांपेक्षा ज्या मतदान केंद्रावर मतदारसंख्या असणार आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...