Saturday, June 29, 2024
Homeनाशिकविधानपरिषदेच्या मतदारसंघांसाठी सकाळपासून मतदान सुरु; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विधानपरिषदेच्या मतदारसंघांसाठी सकाळपासून मतदान सुरु; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत 'इतके' टक्के मतदान

नाशिक | Nashik

- Advertisement -

विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) मुंबई आणि कोकण पदवीधर व मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी आज बुधवार (दि.२६) रोजी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. या चारही मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदारांचा (Voter) उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : २६ जून २०२४ – दिलासा असला तरी टाळलेले बरे

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency Election ) निवडणुकीत यंदा २१ उमेदवार रिंगणात असून आज या सर्व उमेदवारांच्या भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केले जाणार आहेत. नाशिक शिक्षक विभागात ९० मतदान केंद्रांवर मतदान सुरु असून नाशिक जिल्ह्यात २९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे.

आज सकाळी सात वाजेपासून मतदान (Voting) सुरु झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत किती मतदान झाले याची आकडेवारी समोर आली होती. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमधील एकूण ९० मतदान केंद्रावर सकाळी सात ते नऊ या कालावधीत संथ गतीने मतदान सुरू होते.यामध्ये पहिल्या टप्प्यात ६९ हजार मतदानापैकी सहा हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान, या सर्व मतदान केंद्राचा टक्केवारीचा विचार केल्यास सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८ टक्के इतके मतदान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव येथील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांची मतदान केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या