Tuesday, May 7, 2024
Homeजळगावबलशाही लोकशाहीसाठी मतदान साक्षरता गरजेची : प्रा. डॉ. सुनील नेवे

बलशाही लोकशाहीसाठी मतदान साक्षरता गरजेची : प्रा. डॉ. सुनील नेवे

जळगाव jalgaon

भारतीय राज्यघटनेने (Indian Constitution) मतदानाचा (Voting) मूलभूत हक्क आपल्याला दिलेला असून राष्ट्रउभारणीसाठी (nation building) प्रत्येकाने हे आद्यकर्तव्य निभावून मतदान साक्षरता अभियानात (Voting Literacy Campaign) सामील झाले पाहिजे. म्हणजे खर्‍या अर्थाने बलशाही लोकशाही निर्माण होऊ शकेल असे प्रतिपादन भालोद (Bhalod) येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे (College of Arts and Sciences) राज्यशास्त्र (Political Science) विभाग प्रमुख (Head of the Department) व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. डॉ. सुनील नेवे (Prof.Dr. Sunil Neve) यांनी केले.

- Advertisement -

मतदान साक्षरता पंधरवाडा (Voting literacy fortnight) निमित्त ज. जि. म. वी. प्र. सह संचलित नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha Collge) आयोजित ‘बलशाही लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता’ (‘Electoral Literacy for Strong Democracy’) या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात (Online lecture) ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख (Principal Dr. L. P. Deshmukh) होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.डॉ. एस.ए.गायकवाड, प्रा. आर. बी. देशमुख उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. देशमुख यांनी मतदान व यासंबंधीची साक्षरता (Literacy) हे रचनात्मक कार्य असून यातील युवकांचे योगदान (Contribution of youth) महत्त्वाचे आहे असे विवेचन केले.

प्रास्ताविक, परिचय व सूत्रसंचालन प्रा. रविकांत मुंडे यांनी केले तर आभार प्रा. सोनाली रजकुंडल यांनी मानले. व्याख्यानाचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा. निखल भोईटे, प्रा. पौर्णिमा देशमुख यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या