Monday, June 24, 2024
Homeनगरगळ्यात कांद्याची माळ व हातात दुधाची बाटली घेऊन मतदान

गळ्यात कांद्याची माळ व हातात दुधाची बाटली घेऊन मतदान

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबकराव भदगले यांनी सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी गळ्यात कांद्याची माळ व हातात दुधाची बाटली घेवून उस्थळदुमाला येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले. सरकारचे लक्ष कांदा व दुधाकडे केंद्रीत करण्यासाठी तसेच इतर शेतीमाल सर्व बरोबर आणू शकत नसल्याकारणाने त्रिंबक भदगले यांनी मतदान केंद्र क्रमांक-68 मध्ये कांद्याची माळ गळ्यात घालून व हातात दुधाची बाटली घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

त्यांच्याबरोबर उस्थळ दुमाला येथील पुंडलिक मोहिते, वासुदेव काळे, बद्रीनाथ चिंधे, हरी गायकवाड, अशोक गायकवाड, बापूसाहेब गायकवाड आदी शेतकर्‍यांनीही मतदान केले. तालुक्यातील शेतकर्‍यांनी गळ्यात कांद्याच्या माळा व दुधाचा कॅन अडकवून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले होते. शेतकर्‍यांची तरुण पोरं यांनी एकत्रित येऊन उस्थळ दुमाला येथील मतदानाला जाताना शेतकर्‍यांच्या कांदा व दुध दराची नाराजी प्रतिक म्हणून अशाप्रकारे मतदान करुन शेतकरी विरोधी सरकारची भूमिका चव्हाट्यावर आणली. त्यांचे समवेत मतदान केंद्रावर अनेक मतदारांनी फोटोसेशन झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या