Friday, November 22, 2024
Homeनगरवाकी तलाव निम्मा भरण्याच्या मार्गावर

वाकी तलाव निम्मा भरण्याच्या मार्गावर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने धरणात नव्याने पाणी येत आहे. गत सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 37 दलघफू पाणी दाखल झाले आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात 1249 दलघफू पाणीसाठा झाला होता. दरम्यान, भंडारदरा परिसरात काल मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपासून रिपरिप सुरू झाली होती. पावसाचे प्रमाण वाढल्यास व या तलावात पाण्याची आवक वाढल्यास 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव निम्मा भरण्याची शक्यता आहे. आहे. काल सायंकाळी या तलावातील पाणीसाठा 51.68 दलघफू (45.87टक्के) पाणीसाठा आहे.

- Advertisement -

रविवारी सक्रिय झाला होता. शनिवारी भंडारदरात 17 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी 23 मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता भंडारदरात पाऊस झाला. या पावसाची नोंद 5 मिमी झाली आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान रिपरिप पाऊस सुरू होता.पाणलोटाती त्याची हजेरी सुरू होती. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 22 दलघफू पाणी नव्याने आले. घाटघर, पांजरे आणि रतनवाडीतील पाऊस मोजणी यंत्रणा नादुरूस्त असल्याने पावसाची आकडेवारी मिळत नाही. घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पाऊस होत असल्याने येथे भातरोपे तरारली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास पुढील आठवड्यात भात आवणीच्या कामास वेग येणार आहे.

पिंपळगाव खांडमध्ये पाण्याची आवक

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस कोसळत असल्याने आठ दिवसांपूर्वीच आंबित धरण भरले. त्यानंतर मुळा नदी वाहती झाली असून 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणात आवक सुरू आहे. या धरणात आतापर्यंत 100 दलघफू पाणीसाठा आहे. सध्या हळुवार आवक होत असलीतरी पावसाचे प्रमाण वाढल्यास हे धरणही लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी क्षमता असणार्‍या मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या