अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये असलेल्या एका सोनाराच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. 10 ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान रात्रीच्या वेळी घडली. याप्रकरणी उमेश जनार्दन लोळगे (वय 45, रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोळगे यांचे वाळकीमध्ये सोनाराचे दुकान आहे. सायंकाळी काम आटोपून त्यांनी दुकानाला कुलूप लावून ते व्यवस्थित बंद केले हेाते. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उपकापाचक करून सुमारे 35 हजार रुपयांचे चांदीच्या बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू चोरून नेल्या. या घटनेची माहिती समजताच नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे व नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सानप यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी लोळगे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.