Thursday, June 13, 2024
Homeनगरवांगदरीच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला

वांगदरीच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला

आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या कारणातून प्रकार घडल्याचा अंदाज

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

आर्थिक व्यवहारातून झालेला वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्याच्या किरकोळ कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच शिवाजी ज्ञानदेव चोरमले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीगोंदा पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न यासह अन्य गुन्हे दाखल आहेत.

वांगदरी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य शिवाजी चोरमले हे रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सात मित्रांसह काष्टी येथे एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. ते जेवायला बसलेले असतानाच त्याठिकाणी वरील तिन्ही आरोपी आले. त्यांनी चोरमले यांचे मित्र सचिन कुटे यांच्यासोबत आर्थिक व्यवहारावरून वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी चोरमले व त्यांच्या मित्रांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु भांडण सोडवता याचा राग येऊन सूत्रधार शिंदे याने राहुल चोरमले यांना लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देखील चोरमले यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिंदे व त्याच्या दोन साथीदारांनी आम्ही कोण आहेत हे तुम्हाला दाखवतो एकाला पण जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तिघे आरोपी तिथून निघून गेले.

त्यानंतर काहीवेळातच सूत्रधार शिंदे यांच्यासह अनोळखी 7 ते 8 इसम हातात लाकडी दांडके, लोखंडी कोयता, चाकू, टिकावं घेऊन परत त्या हॉटेलमध्ये आले व त्यांनी शिवाजी चोरमले व त्यांच्या सहकार्‍यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयता, टिकावाने मारहाण करण्यास सुरुवात केली यात कोयत्याने वार झाल्यामुळे चोरमले व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी श्रीगोंदां पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जीवघेणा हल्ला व जबर मारहाण प्रकरणी शिवाजी चोरमले यांनी श्रीगोंदा पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सूत्रधार शिंदे (रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर), गणेश दत्तात्रय मचाले (रा. इनामगाव, ता. शिरूर), राहुल लहू महारनोर (रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा) यांच्यासह अनोळखी 7 ते 8 इसमांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट रचून जबर मारहाण, आर्म अ‍ॅक्ट यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या