Tuesday, April 8, 2025
Homeमहाराष्ट्रAccidetnt News : रानडुक्कर आडवं आल्याने भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जणांचा...

Accidetnt News : रानडुक्कर आडवं आल्याने भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

वर्धा । Wardha

समुद्रपूर तालुक्यातील तरोडा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. कार आणि डिझेल टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या पत्नी व दोन लहान मुलांसह रामनवमीच्या कार्यक्रमानंतर मांडगाव येथून वर्ध्याकडे परत येत होते. दरम्यान, तरोडा गावाजवळ अचानक रानडुक्कर रस्त्यावर आल्याने कार अनियंत्रित झाली आणि समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला धडकली.

या अपघातात प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी प्रियंका आणि तीन वर्षांचा मुलगा जागीच ठार झाले. पाच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. हसत-खेळतं कुटुंब एका क्षणात संपुष्टात आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस अधिक तपास करत असून घटनेचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ‘हा’ क्रिकेटपटू...

0
मुंबई | Mumbai भारतीय संघाचा माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) क्रिकेटनंतर त्याच्या राजकारणातील नव्या इनिंगला सुरूवात करत आहे. केदार जाधव आज दुपारी तीन...