Friday, May 3, 2024
Homeनगरवारी कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला 22 कोटीची प्रशासकीय मान्यता

वारी कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला 22 कोटीची प्रशासकीय मान्यता

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

वारी कान्हेगाव (Vari-Kanhegav) संयुक्त पाणी पुरवठा योजनेला (Water supply Scheme) पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांच्याकडून काही दिवसांपूर्वी हिरवा कंदील (Green Lantern) मिळविला होता. या योजनेला लवकरात लवकर निधी (Fund) मिळावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून वारी कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला (Wari Kanhegaon Water Supply Scheme) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) 22 कोटी 11 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता (Administrative Recognition) दिली आहे अशी माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिली.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील (Kopargaon Assembly constituency) अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना (Water Supply Scheme) रखडल्या होत्या. यामध्ये बहुतांशी गावे हि मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. या गावांपैकी मोठी लोकसंख्या असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या (Kopargav Taluka) पूर्व भागातील वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा (Wari-Kanhegaon Joint Water Supply Scheme) देखील समावेश होता. मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेली हि पाणी पुरवठा योजना आजवर अनेक वेळा परत गेली होती. त्यामुळे आमचा पाणी प्रश्न सोडवा असे साकडे वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांनी ना. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांना घातले होते.

शासनदरबारी पाठपुरावा करून या पाणी पुरवठा योजनेला राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मंजुरी मिळवत लवकरात निधी मिळून या योजनेचे काम सुरु व्हावे यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारकडून 22 कोटी 11 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पाणी पुरवठा योजनेचे लवकरच काम सुरु होणार असून ना. आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न अल्पकाळात सोडविल्याबद्दल वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या