Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारआरोग्य विभागातील रिक्त पदांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

नंदुरबार ।Nandurbar । प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ग्रामीण रुग्णालय (Molgi Rural Hospital) वेळेत उपचार न मिळाल्याने (Without treatment) काठी येथील 22 वर्षीय निलिमा वळवी यांचा मृत्यू (death) झाल्याचा आरोप (Accusation) करत नातेवाईकांनी आंदोलन (Movement by relatives) केले होते. त्यानंतर धडगाव अक्कलकुवा मतदार संघाचे आ.अ‍ॅड. के. सी. पाडवी (Adv. K. C. Padavi) यांनी अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा (Review of the health system) घेतला. दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक रिक्त पदे असून ही रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असून याकडे शासनाने (Government) लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या (Warning of movement) इशारा अ‍ॅड.पाडवी त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

आ.अ‍ॅड. पाडवी यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालय आणि पोषण पुनर्वसन केंद्राला भेट तेथील सुविधांची पाहणी केली तसेच आरोग्य प्रशासनाच्या कारभाराच्या संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून रिक्त पदे आणि प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारामुळे सातपुड्यात आरोग्य यंत्रणा सलाईन वर असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. महविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आसल्या तरी वरिष्ठ अधिकार्‍याकडून योग्य नियोजन केले जात नसल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले .सरकारने सातपुड्यातील आरोग्य समस्या आणि कुपोषणाचा प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.आरोग्याचा समस्या राजकारण न करता जिल्ह्यातील सर्वच पक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मयत निलिमा वळवी यांच्या परिवाराला आर्थिक मदत

आ.अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी काठी येथे जाऊन मयत नीलिमा वळवी यांच्या परिवाराची भेट घेतली त्यांना शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगितले. त्यासोबत पाडवी यांनी मयत महिलेच्या परिवाराला आर्थिक मदतही केली. यापुढे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आरोग्य सुविधां न मिळाल्याने कुणाचा जीव जात असेल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

रिक्त पदांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक रिक्त पदे असून ही रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असून याकडे शासनाने लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या इशारा त्यांनी दिला आहे महाविकास आघाडीच्या काळात ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

आताच्या सरकारने ही आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून यात कुठलेही राजकारणात दुर्गम भागातील आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी आ.अ‍ॅड. पाडवी यांनी केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या